गेल्या अनेक वर्षांपासून निकृष्ट झालेल्या ऐनापूर-मोळे रस्त्याच्या 3 कोटी रुपये खर्चाच्या आणि शेडबाळ स्टेशन रस्त्याच्या 60 लाख रुपये खर्चाच्या रस्ता कामाचा कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला.

आमदार श्रीमंत पाटील यांनी आज, शुक्रवारी शेडबाळ स्टेशन गावात रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले. यावेळी आ. श्रीमंत पाटील यांनी अभियंते व कंत्राटदारांना रस्त्यांची कामे दर्जेदार करण्याच्या सूचना देत निकृष्ट कामे तुमच्याकडून पुन्हा होऊ नयेत, असा इशारा दिला.

या कार्यक्रमात नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महांतेश कोल्लापुरे, भाजप पक्षनेते भरतेश पाटील, उत्कर्षी पाटील, संदीप साळुंके, नगरपंचायत सदस्य रेणुका तुकाराम कनकंबळे, मारुती माकनवर, नानासाहेब जाधव, सचिन होसावडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
ऐनापूर-मोळे रस्त्याच्या कामाचा प्रारंभ करण्याच्या वेळी तमन्ना परशेट्टी, दादा पाटील, राजेंद्र पोतदार, मोहन कारची, कंत्राटदार ए. जी. हळ्ळी, शिवू मालगावे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
अनेक वर्षांनंतर रस्ता सुधारणेच्या कामांना चालना देण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


Recent Comments