Kagawad

कागवाडच्या वीज समस्येबाबत आ. श्रीमंत पाटील यांची ऊर्जामंत्र्यांशी चर्चा

Share

कागवाड तालुक्‍यातील सिंचन प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच सात तास अखंड वीज पुरवठा करावा, अशी मागणी आ. श्रीमंत पाटील यांनी ऊर्जा मंत्र्यांकडे केली आहे.

कागवाड तालुक्‍यातील वीज पुरवठ्याच्या समस्येसंदर्भात आज सरकारी विश्रामगृहातून आ. श्रीमंत पाटील यांनी थेट हुबळी येथील हेस्कॉमच्या एमडी डी. भरती यांच्याशी व्हिडिओ कॉलवर चर्चा केली. वीज पुरवठ्याअभावी शेतकऱ्यांना शेतीला पाणी देणे शक्य होत नाहीय. त्यामुळे ते मला प्रश्न विचारून भंडावून सोडत आहेत. कृपया त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्वरित निर्णय घ्या, पूर्वीसारखे सिंगल फेज कनेक्शनने वीजपुरवठा करा अशी मागणी त्यांनी केली.

त्यानंतर आमदार श्रीमंत पाटील यांनी दूरध्वनीद्वारे राज्याचे ऊर्जामंत्री सुनील कुमार यांच्याशी संपर्क साधून येथील शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आणि दोन दिवसांत या समस्यांवर उत्तर न दिल्यास त्या शेतकऱ्यांसोबत लढा देऊ, असा इशारा दिला. आमदारांसह तहसीलदार राजेश बुर्ली व कागवाड तालुक्यातील विविध गावातील शेतकरी उपस्थित होते.

Tags: