जत तालुक्यातील कन्नडिग महादेव अंकलगी यांनी कर्नाटकात सामील होण्याच्या जत तालुक्यातील गावांच्या निर्धाराबद्दल वक्तव्य केल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईच्या विधानाचे अभिनंदन करणारे व्हिडिओ निवेदन प्रसिद्ध केले आहे.

व्हिडिओमध्ये महादेव अंकलगी म्हणाले आहेत की, मी जत तालुक्यातील 44 गावांच्या वतीने बोलल्याबद्दल सीएम बोम्मई यांचे अभिनंदन करू इच्छितो. जत तालुक्यात नेहमीच दुष्काळग्रस्त स्थिती असते. महाराष्ट्र सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे जत तालुका दुष्काळाने होरपळत आहे. महाजन अहवालानुसार जत तालुक्यातील गावे कर्नाटकात सामील व्हावीत. आम्ही महाराष्ट्रात असूनही तुम्ही आमच्यावर प्रेम दाखवले. सीमाभागातील कन्नडिगांच्या विकासासाठी दिलेल्या अनुदानाबद्दल आम्ही आभारी आहोत, असे ते म्हणाले आहेत.
एकंदर, सीमाप्रश्नावरून बोम्मई यांनी केलेल्या विधानावरून फुटकळ प्रसिद्धीसाठी महाराष्ट्रातील काही कन्नडीग असे व्हिडिओ जारी करून महाराष्ट्राच्या मातीशी बेईमानी करत असल्याची प्रतिक्रिया जतमधील मराठी भाषिकांनी यावर दिली आहे.


Recent Comments