DEATH

माजी आमदार श्रीशैलप्पा बिदरूर यांचे बैठकीवेळी निधन

Share

माजी आमदार श्रीशैलप्पा बिदरूर यांचे आज काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या बैठकीतच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 60 वर्षांचे होते.

होय, 2023 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, बेंगळुरूमधील वरथूरजवळ केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि कॉंग्रेसचे राज्य प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या तिकीट इच्छुकांची बैठक बोलावण्यात आली होती. बैठक सुरू होण्यापूर्वी माजी आमदार श्रीशैलप्पा बिदरूर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. बैठकीला आलेले माजी आमदार बिदरूर यांना अचानक उलट्या होऊन ते जागीच कोसळले. त्यांना तत्काळ वरथूर कोडीजवळील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार निष्फळ ठरल्याने त्यांचा मृत्यू झाला. श्रीशैलप्पा बिदरूर गदग जिल्ह्यातील रोण मतदारसंघाचे आमदार होते. 2019 मध्ये त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Tags:

EX MLA BIDARUR DEATH