कोणी फळे विकतोय तर कोणी भाजी, तर कोण चक्क बॉम्बे मिठाई. अगदी व्यावसायिक विक्रेत्यांप्रमाणे कौशल्याने या बाजारात ते उत्साहाने साहित्य विकताहेत आणि घेणारेही तितक्याच कौतुकाने ते खरेदी करताहेत. हे दृश्य पहायला मिळाले मांजरी येथील शाळेच्या आवारात विध्यार्थ्यानी भरवलेल्या बाजाराचे !

होय, चिक्कोडी तालुक्यातील मांजरी गावात शांतीसागर शिक्षण प्रसारक मंडळाने मुलांना व्यावहारिक ज्ञान आणि नफा-तोटा याची जाणीव करून देण्यासाठी बाजार महोत्सवाचे आयोजन केले होते. माजी आमदार कल्लाप्पान्ना मगेन्नावर यांच्या हस्ते बाल बाजाराचे उदघाटन करण्यात आले. मुलांनी भरविलेला हा बाजार पाहून त्यांनीही तोंडभरून मुलांचे कौतुक केले. मुलांनी या बाजारात भाजीपाल्यासह विविध वस्तूंची विक्री केली. तसेच गावकऱ्यांनीही या बाल बाजारात सहभागी होऊन खरेदी करत मुलांच्या बाजाराच्या यशात हातभार लावला.

संस्थेचे अध्यक्ष सनतकुमार पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही या बाल महोत्सवाचे आयोजन केले आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य विकसित करण्याच्या हेतूने याचे आयोजन केले आहे.

शालेय मुलांचा हा अनोखा बाजार पाहून गावकऱ्यांनाही आनंद व्यक्त केला. यावेळी पीकेपीएसचे अध्यक्ष अण्णासाहेब यादव, दत्त साखर कारखान्याचे संचालक अमर यादव, शिवाजी पतसंस्थेचे चेअरमन रामचंद्र भोसले, संचालक मोहन लोकरे, शांती सागर शिक्षण संस्थेचे सचिव दादासाहेब भोजकर, रघुनाथ मोरे, मनोहर भोजकर, बंदिराम बेडगे, शीतल यादव, शीतल पाटील, पीकेपीएसचे व्यवस्थापक पांडुरंग कुलकर्णी व शांतीसागर शैक्षणिक संस्थेचे कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments