Belagavi

फिनिक्स स्कूलच्या स्थापनदिनानिमित्त क्रीडास्पर्धांना प्रारंभ

Share

बेळगावातील फिनिक्स स्कूलच्या 24व्या स्थापनदिनानिमित्त आयोजित 14 व 17 वर्षाखालील मुलामुलींच्या क्रीडास्पर्धांना आज शानदार प्रारंभ करण्यात आला.

होय, बेळगावातील फिनिक्स स्कूलच्या स्थापनेला 24 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त 14 व 17 वर्षाखालील मुलामुलींच्या क्रीडास्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांना आज गुरुवारी शानदार प्रारंभ करण्यात आला. संस्थेचे संस्थापक चेअरमन विवेकराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होनगा येथील फिनिक्स स्कूलच्या मैदानावर आयोजित या स्पर्धांमध्ये अमोघ स्कूल, रायबाग, ज्ञान प्रबोधन मंदिर, बेळगाव, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, नूल व गडहिंग्लज येथील सुमारे 400 क्रीडापटूंनी भाग घेतला आहे.

या स्पर्धेच्या उदघाटन समारंभात डीपी स्कूलच्या प्राचार्या सिस्टर रोजम्मा जोसेफ, कर्नाटक राज्य टेबलटेनिस असोसिएशनचे उपाध्यक्ष व बेळगावचे नामांकित टेबल टेनिस प्रशिक्षक संगम बैलूर, फिनिक्स स्कूलच्या प्राचार्या सर्फुन्निसा सुभेदार, कनक मेमोरियल स्कूलचे माजी प्राचार्य शिवलाल कलाल, फिनिक्स स्पोर्ट्स कौन्सिलच्या सेक्रेटरी अलका पाटील, प्राचार्या विद्या वग्गन्नावर, उपप्राचार्या अनुपमा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

मिशेल मोझेस यांनी पाहुण्यांचे स्वागत करून परिचय करून दिला. त्यानंतर फिनिक्स स्कूलच्या प्राचार्या सर्फुन्निसा सुभेदार यांनी पाहुण्यांचे मानचिन्ह आणि रोपं देऊन स्वागत केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या क्रीडापटूंनी शानदार पंथ संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते तिरंगी फुगे हवेत सोडून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. फ्लो
शाळेचे क्रीडापटू अनुष्का पिरगी, राहुल मल्लन्नावर, आर्या देसाई व कृष्णकुमार यांनी क्रीडाज्योत मैदानावर फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द केली. खेळाडू कृष्णकुमार याने क्रीडापटूंना शपथ देवविली. त्यानंतर हॉकी व ऍथलेटिक्स स्पर्धा घेण्यात आली. हीना मोकाशी हिने सूत्रसंचालन केले. अनुष्का पिरगी हिने आभार मानले.

Tags: