Khanapur

28 रोजी गंदिगवाड येथे पंचमसाली आरक्षण हक्क परिषद : बसवजय मृत्युंजय स्वामी

Share

खानापूर तालुक्यातील गंदिगवाड येथे उद्या, 25 तारखेला लिंगायत पंचमसाली आरक्षण हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव ती पुढे ढकलून 28 रोजी घेण्यात येणार आहे.

कुडल संगम लिंगायत पंचमसाली पीठाचे बसवजय मृत्युंजय स्वामी यांनी खानापुरात पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. 28 तारखेला गंदिगवाड गावच्या बसस्थानकापासून दुपारी 1 वाजता परमज्योती हायस्कूलपर्यंत पूर्ण कुंभ मिरवणूक काढण्यात येणार आहे. खानापूर तालुक्‍यातील 50 हून अधिक गावांमध्ये एकूण लोकसंख्येच्या 40 टक्के लिंगायत व इतर जमाती आहेत, असे सांगून, तालुक्‍यातील विविध भागातील 20 हजाराहून अधिक पंचमसाली व इतर उपजमातीचे लोक या परिषदेला उपस्थित राहणार आहेत असे बसवजय मृत्युंजय स्वामी यांनी सांगितले.
यावेळी अखिल भारतीय लिंगायत पंचमसाली महासभेचे नेते उपस्थित होते.

Tags: