चिक्कोडी अबकारी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुणे-बेंगळूर महामार्गावरील कोगनोळीजवळील एका धाब्यावर छापा टाकून बेकायदेशीररीत्या जमा केलेले अंदाजे 34 किलो खसखस फळे जप्त केली. या प्रकरणी धाबा चालकाला अटक कऱण्यात आली आहे.

चिक्कोडी अबकारी विभागाचे उपअधीक्षक अनिलकुमार नंदेश्वर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गावरील पुरोहित धाब्यावर छापा टाकून बेकायदेशीररीत्या जमा केलेले अंदाजे 34 किलो खसखस जप्त करण्यात आले. या प्रकरणी धाबाचालक आरोपी गिरीधरसिंग किशोरसिंग राजपुरोहित याला अटक करून न्यायालयात हजर केले.
या छाप्यात उत्पादन शुल्क निरीक्षक राजू गोंडे, शिवकुमार अम्मिनभावी, कर्मचारी अर्जुन अल्लापूर, दशरथ कुराडे, केदारी नलावडे, सागर बोरगावे, बी. एस. उरुबिनट्टी आदीनी भाग घेतला. अफूच्या बियांची एकूण किंमत 1 लाख 80 हजार रुपये आहे.


Recent Comments