hubali

मूग परत घेण्याच्या नोटिसीचा प्रश्न सोडवणार : मंत्री मुनेनकोप्प

Share

खरेदी केलेले मूग परत घेण्याची नोटीस शेतकऱ्यांना दिल्याचा विषय माझ्या निदर्शनास आलेला नाही. अशी नोटीस दिलेली असल्यास हा प्रश्न तातडीने सोडवू, असे साखर मंत्री शंकर पाटील-मुनेनकोप्प यांनी सांगितले.
व्हॉईस : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त आज हुबळीत आयोजित जोशी चषक क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन केल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुनेनकोप्प म्हणाले, मूग खरेदी करताना ओलाव्याची समस्या असल्याचे सांगितले. खरेदी केंद्रावर आर्द्रता न पाहता शेतकऱ्यांकडून मूग खरेदी केले जात आहेत. मी यापूर्वीच पणन मंडळ आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. खरेदी केंद्रावर 500 शेतकऱ्यांची नोंदणी असताना त्यापैकी केवळ 200 शेतकऱ्यांकडून मूग खरेदी केले आहेत. खरेदीची मुदत आधीच संपली आहे, त्यामुळे खरेदीसाठी आणखी पंधरवड्याला परवानगी द्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे असे ते म्हणाले.

एफआरपी दरासाठी ऊस शेतकऱ्यांनी यापूर्वीच आंदोलन केले आहे. एफआरपीच्या वर जादा पैसे देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. पण एफआरपी केंद्र सरकार ठरवते, साखर कारखानदार एफआरपीपेक्षा जास्त भाव देत आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली निघाले असून एफआरपी वाढीव भावासाठी शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे. यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे यापूर्वीच विनंती केली आहे. एकाही साखर कारखान्याने शेतकऱ्याच्या उसाचे पैसे शिल्लक ठेवलेले नाहीत. निराणी यांच्या साखर कारखान्याविरोधात तक्रार प्राप्त झाली आहे. 27 कोटी रुपयांची थकबाकी ठेवल्याची तक्रार आहे. निराणी यांनी तत्काळ थकबाकी भरण्याचे आश्वासन दिले आहे असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त नेहरू मैदानावर आयोजित प्रल्हाद जोशी चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्प यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर बोलताना ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री क्रिकेटला प्रोत्साहन देऊन आपले क्रीडाप्रेम व्यक्त करत आहेत. 125 कोटी रुपये खर्चून स्पोर्ट्स पार्क बांधून युवा समाजाला खेळासाठी प्रोत्साहन देण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

खेळातील विजय-पराजय समानतेने स्वीकारावे, असा सल्ला त्यांनी दिला.

Tags: