पेन्शन वाढीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेचा आग्रह करून बेळगावात दिव्यांगांनी आंदोलन केले.
व्हॉइस ओव्हर : बुधवारी बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या दिव्यांगांनी आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी आंदोलन केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री बोम्मई यांना निवेदन दिले.
यावेळी बोलताना दिव्यांग उमेश रोट्टी यांनी सांगितले कि , 75% ते 100% पर्यंत शारीरिक अपंगत्व असलेल्या लोकांसाठी सध्या 1400 रुपये पेन्शन दिली जात आहे . पण त्याचा काहीच उपयोग नाही दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे आपले जगणे खूप कठीण बनले आहे .
त्यामुळे सरकारने सध्या दिली जात असलेली पेन्शन 3,000 ते 5,000 रुपयांपर्यंत वाढवावी . तसेच विवाहित दिव्यांगांच्या मुलांना शासनाने मोफत शिक्षण व शासकीय अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले दिव्यांग बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते.


Recent Comments