बेळगाव जिल्ह्यातील निप्पाणी तालुक्यातील अक्कोळ गावात 2 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या नवीन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे मंत्री शशिकला जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाला संबोधित करताना मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या की, सीमावर्ती शिक्षणावर अधिक भर देण्याच्या उद्देशाने अक्कोळ गावात 2 कोटी रुपये खर्चून शासकीय प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले असून या प्रशिक्षण केंद्रात येत्या काळात आणखी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

नंतर खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले की, शिक्षणावर अधिक भर देण्याच्या उद्देशाने निपाणी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शाळा, महाविद्यालये बांधण्यात आली असून आज अक्कोळ गावात औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सभापती अनिता कुंभार , सिद्धू नरोटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बी.बी.बेडकिहाळ, विजया संगप्पगोळ, प्रकाश शिंदे, रामगौडा पाटील, बसवप्रभू हिरेमठ, एस.एस.खिलारे, जितेंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते. प्राचार्य गोकवी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.


Recent Comments