हुक्केरी शहरात कर्नाक राज्योत्सव भव्य मिरवणूक काढून उत्साहात साजरा करण्यात आला.

हुक्केरी शहरातील कर्नाटक राज्योत्सवाचे उद्घाटन माजी जिल्हा पंचायत सदस्य पवन कत्ती आणि पृथ्वी कत्ती यांच्या हस्ते हुक्केरी हिरेमठचे चंद्रशेखर महास्वामी आणि क्यारगुड्ड मठाचे अभिनव मंजुनाथ स्वामीजी यांच्या दिव्य उपस्थितीत उमेश कत्ती आणि पुनित राजकुमार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना स्वामीजी म्हणाले की, कर्नाटक राज्योत्सव हा सीमावर्ती शहर हुक्केरी येथे सर्व धर्मीय लोक त्यांचा घरचा सण म्हणून उत्साहात साजरा करत आहेत. राज्य सरकारनेही या राज्योत्सवाला प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तसेच माजी जिल्हा पंचायत सदस्य पवन कत्ती, नगरसेवक महावीर निलजगी, सदानंद करेप्पगोळ, राजू मुन्नोळी यांनी पत्रकारांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या. यावेळी कर्नाटक राज्योत्सव समिती सदस्य, नगरपरिषद, विविध संघटनांचे पदाधिकारी व कन्नड रसिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी कर्नाटकाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या प्रतिकांसह वाद्यपथकांच्या सहभागाने भव्य मिरवणूक काढण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांचे लेझीम पथक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. दुपारी कोर्ट सर्कलपासून निघालेल्या या मिरवणुकीचे सभेत रूपांतर झाले.


Recent Comments