बेळगावात शालेय मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
कन्नड आणि संस्कृती विभाग आणि सार्वजनिक शिक्षण खाते यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथील कुमार गंधर्व कला मंदिरात बालमहोत्सवाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यतक्रमाला संबोधित करताना अनिल बेनके म्हणाले की, भारतीय संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ आहे. राज्यांनुसार वेगवेगळ्या संस्कृती आपण पाहतो. आपण आपली संस्कृती पूर्वीपासून जतन करत आलो आहोत. परदेशी लोक आपल्या संस्कृतीचे पालन करण्यासाठी भारतात येतात. आपला देश धर्मनिरपेक्ष बनला आहे. त्यामुळे आपली संस्कृती आपल्याला वाचवायची आहे. संस्कृती म्हणजे मानवता, प्रेम. संपूर्ण जगासाठी आदर्श असलेली आपली संस्कृती जतन करणे हे आपले कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.

कार्यक्रमात सुगम संगीत, एकपात्री प्रयोग , समूहगीत, भरतनाट्यम, भावगीत, स्वर संगीत, लोकगीत, लोकनृत्य आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कन्नड आणि सांस्कृतिक विभागाच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री यांनी माहिती दिली की, शहरातील विविध शाळांमधील मुलांनी सहभाग घेतला.

डीडीपीआय बसवराज नालतवाड , बीईओ रवी भजंत्री, अन्नपूर्णा, एम एन सत्यनारायण, रोहिणी, सुनील पुजारी आणि इतर कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषेत आपली कला सादर केली.


Recent Comments