Belagavi

संजय पाटील यांचा आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांना टोला

Share

विकासकामे केली असती तर टिफिन बॉक्स वाटण्याची गरजच पडली नसती, असे म्हणत माजी आमदार संजय पाटील यांनी बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना जोरदार टोला लगावला.

बेळगावात आज शासकीय विश्रामधाम येथे पत्रकारांशी बोलताना भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी, याबाबत आम्ही काय करू शकतो, असा सवाल केला. वाटप करणारे वाटप करतील. जिल्हाध्यक्ष म्हणून मी सध्या पक्षाचे संघटन करत आहे. मी पुरुष आहे, हळदी-कुंकूचा कार्यक्रम कसा करू शकतो. कार्यक्रम घ्यायचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. प्रत्येकजण त्यांना हवे ते कार्यक्रम करू शकतो. ते त्यांचा कार्यक्रम करतात. पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने पक्ष संघटनेच्या विकासासाठी पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहीन, असे ते म्हणाले.

बेळगाव ग्रामीण मतदारसंघात टिफिन बॉक्सचे वाटप केले जात आहे, यावर बोलताना घेणारे टिफिन बॉक्स घेत असतील. मात्र भाजप कार्यकर्ते कोणाकडूनही टिफिन बॉक्स घेत नाही. भविष्यात आणखी काही वेगळे वाटले जाऊ शकते. याचा विचार करायला हवा. निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर व्हायला हवी. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना मतदानाचा अधिकार दिला. ते मतही कोणी विकू नये, असा टोला त्यांनी लगावला.

तुमच्या पक्षातील कोणीही काहीही वाटले नाही का, या प्रसार माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना काल आमच्यांनी एक पुस्तक वितरित केले. पण दारू कोणी वाटली नाही, पुस्तक जरूर वाटली पाहिजेत. गरिबांच्या मुलांना शिकवले पाहिजे. यातून त्यांना ज्ञान मिळते. निवडणुकीदरम्यान आम्हाला मतदान करावे लागेल अशी अट घालून टिफिन बॉक्सचे वाटप करताहेत. बेळगाव ग्रामीण मतदार संघात मंदिर बांधण्यासाठी 50 लाख रुपये देतो पण दुसऱ्या पक्षाचे टेबल घालायचे नाही नये, अशीही अट घातली आहे. मी 10 वर्षांत काय काम केले अन काय नाही ते लोकांवर सोडतो. मी उद्या सकाळी खात्री देत ​​नाही. उद्या सकाळी उठेन की नाही माहीत नाही. अशी इच्छा नसावी. विकास करणाऱ्यांना काही वाटण्याची गरज नाही असे सांगत संजय पाटील यांनी अप्रत्यक्षपणे लक्ष्मी हेब्बाळकर यांना टोला लगावला.

Tags: