Banglore

उद्यापासून नंदिनी दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ : केएमएफ अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी

Share

बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आणि प्रलंबित असलेली नंदिनी दूध दरवाढ अखेर लागू झाली आहे. उद्या गुरुवारपासून केएमएफच्या नंदिनी दूध आणि दह्याच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ होणार असल्याची माहिती केएमएफचे अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दरवाढीचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. 2 रुपयांची वाढ संपूर्ण शेतकऱ्याला दिली जाईल. शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. केएमएफ त्यांच्या मदतीला धावून येईल. दररोज 77 लाख लिटर दुधाचे संकलन होते आणि 50 लाख लिटरची विक्री होते. उर्वरित 27 लाख लिटर दुधाचे इतर पदार्थ बनवले जात आहेत. त्यातून मिळणारा नफा शेतकर्‍यांकडे वर्ग करण्याचा विचार करत असल्याचे भालचंद्र जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. आता शेतकऱ्यांसाठी हे वरदान ठरणार आहे. मात्र ग्राहकांचाच खिसा कापला जाणार आहे.

Tags: