Chikkodi

हेस्कॉम अधिकार्यांचे अक्षम्य दुर्लक्ष : गावकऱ्यांच्या जीवाला धोका

Share

रायबाग तालुक्यातील जलालपूर गावातील आणेबाईकोडीमध्ये हेस्कॉम अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे हजारो लोकांना जीव मुठीत घेऊन फिरावे लागत . गावकऱ्यांना नेमकी कशाची भीती आहे ते पाहुयात.

जलालपूर-रायबाग मार्गावरील आणेबाईकोडी येथील विद्युत खांब जवळच असलेल्या दुसऱ्या विद्युत खांबाला टेकला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे . मात्र कोणीही लक्ष देत नसल्याचा आरोप लोक करत आहेत.

वीज खांब दुसर्या हाय-व्होल्टेज खांबाला टेकल्याने मोठी दुर्घटना घडू शकते . त्याशिवाय येथील रस्त्यावरील, लोंबकळणाऱ्या विद्युत तारा घट्ट बांधा असे कर्मचाऱ्यांना सांगूनही कामगारांनी त्या बांधलेल्या नाहीत, काही दिवसांपासून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. तेव्हाही हेस्कॉमने कर्मचाऱ्यांना सांगितले. मात्र अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत

संबंधित अधिकाऱ्यांनी सतर्क होऊन तातडीने दुरुस्ती करावी. या टेकलेल्या विद्युत ख्माबांमुळे मोठी विद्युत दुर्घटना घडू शकते . काही अनर्थ घडल्यास त्याला थेट अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे .

हे विद्युत खांब असलेल्या रस्त्यावरुन लोकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे . हेस्कॉम अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन विद्युत खांब हटवण्याची गरज आहे .

Tags: