अतिरेकी कारवायांना आळा घालण्यासाठी नवा कायदा आणून कडक कारवाई करावी. तसेच यूपीच्या मॉडेलवर राज्यात कडक कारवाई करावी, अशी मागणी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी केली.
बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांनी मंगळवारी बेळगाव येथील एका खासगी हॉटेलमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला . राज्यविरोधी आणि देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी आम्ही करत आहोत. हे बॉम्बस्फोट घडवून आणणारे आणि पाकिस्तानच्या बाजूने घोषणा देणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कर्नाटकात कारवाई केली जावी . याबाबत विशेष कायदा करावा. उत्तर प्रदेशात जे केले जात आहे, त्याची अंमलबजावणी राज्यातही व्हायला हवी. जे आरोपी असतील त्यांना अटक करून तुरुंगात पाठवा. . कायद्यात बदल करून अतिरेकी कारवायांना आळा घालण्यासाठी नवा कायदा अमलात आणण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.
आता तुमचेच सरकार उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात सत्तेवर आहे. उत्तर प्रदेशात जे घडत आहे ते कर्नाटकात का होत नाही, या माध्यमांच्या प्रश्नाचे उत्तर देताना आ . अभय पाटील म्हणाले कि , आपल्या मुख्यमंत्र्यांनीही अनेक पावले उचलली आहेत. यूपी मॉडेल राज्यात राबवले गेलं पाहिजे असा आमचा आग्रह आहे.
त्यांच्या विचारसरणीला संबंधितांकडून संरक्षण दिले जात आहे. पोलिसांनी , त्यांना आश्रय देणार्याला अटक करायला हवी. मग ही समस्या दूर होईल. तसेच राजकीय शक्तींच्या सहकार्याशिवाय असे प्रकार घडले नसावेत असा आरोप अभय पाटील यांनी केला.


Recent Comments