दिव्यांगांना शासकीय सुविधा मिळवून देऊन त्यांना स्वावलंबी करून त्यांची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे असे बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती म्हणाले.

हुक्केरी तालुका महिला व बालकल्याण व अपंग व ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण विभागाच्यावतीने दिव्यांगांना तीनचाकी वाहनांचे वाटप करण्यात आले यावेळी माध्यमांशी बोलतांना बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती म्हणालेकी , दिवंगत उमेश कत्ती यांच्या अनुदानातून दिव्यांगांसाठी तीनचाकी गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत . या वाहनांच्या मदतीने अनेक दैनंदिन वस्तू घरोघरी पोहोचवून ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.

यावेळी बेळगावचे मंडल अधिकारी बलराम चव्हाण, तहसीलदार डॉ.डी.एच.हुगार, बालविकास विभागाचे अधिकारी एच.होलेप्पा, तालुका अपंग समन्वयक चंद्रकांत तळवार, गुरू कुलकर्णी, परगौडा पाटील, अशोक पट्टणशेट्टी , राजू मुन्नोळी , मिर्झा मोमिन आदी भाजप नेते उपस्थित होते.


Recent Comments