दक्षिणचे आमदार अभय पाटील म्हणाले की, शहरातील विद्यार्थ्यांना पीयूसी निकालात अपेक्षित गुण मिळत नाहीत, याची दखल घेत सुधारात्मक उपाय म्हणून सराव प्रशोत्तरे साहित्य वाटपाचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या संदर्भात मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन , आमदार अभय पाटील यांनी सांगितले की, या उपक्रमात विविध जिल्ह्यातील सुमारे ४५ शिक्षकतसेच शिक्षण तज्ज्ञांनी सहभाग घेऊन सराव प्रशोत्तर पुस्तके तयार केलीआहेत . एसएससी निकालात जिल्हा पाचव्या क्रमांकात आहे . तर पीयूसी निकालाच्या बाबतीत जिल्हा 22 व्या स्थानावर आहे. या चांगल्या नोट्सच्या आधारे सराव साहित्य तयार करून विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणार आहे . कला/वाणिज्य विभागालाही चांगले सराव साहित्य मिळावे अशी आमची अपेक्षा आहे म्हणून ही पुस्तके पहिलाच प्रयत्न म्हणून आणली आहेत.
सध्या विज्ञान शाखेसाठी पुरेशी दर्जेदार पुस्तके उपलब्ध आहेत. पण आता कला आणि वाणिज्य शाखेच्याही परीक्षा येत आहेत, या दोन्ही विभागांमध्ये चांगले निकाल पहायला मिळायला हवेत. हे साहित्य PU बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि त्याचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीनुसार तयार केलेले आहे . बेळगाव दक्षिण-उत्तर-ग्रामीण भागातील एकूण 9600 विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. ते म्हणाले की, बेळगाव शहरातील उत्तर व दक्षिण मतदार संघांच्या आमदार द्वयींच्या नेतृत्वाखाली ‘दिशा’ कार्यक्रमांतर्गत पीयू विद्यार्थ्यांना या साहित्याचे मोफत वाटप करण्यात येत आहे. सध्या सराव अभ्यासक्रमाचे साहित्य फक्त इंग्रजी माध्यमात तयार केले जाते. कला शाखेचे 1666, वाणिज्य शाखेचे 3784 आणि विज्ञान शाखेचे 3913 विद्यार्थी असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार अभय पाटील म्हणाले की, पीयूसी प्राध्यापकांच्या अध्यापनाचा दर्जा सुधारावा तसेच ट्युशन माफियांवर तात्काळ वचक बसावा याबद्दल गंभीरपूर्वक विचार केला जत आहे . (बाईट )
बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, महांतेश पाटील, श्रीरंग देशपांडे, आशुतोष आदी यावेळी उपस्थित होते.


Recent Comments