बेळगाव येथील केएलई संस्थेच्या जेएन मेडिकल कॉलेजमध्ये आयोजित आरोग्य विज्ञान प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.
वैद्यकीय विज्ञान प्रदर्शन , आरोग्य शिक्षण आरोग्य वितरण प्रणालीशी संबंधित विविध पैलूंबद्दल व्यावहारिक ज्ञान मिळविण्यास मदत करत आहे. या प्रदर्शनात विद्यापीठातील वैद्यकीय , दंतचिकित्सा, फार्मसी, आयुर्वेद, फिजिओथेरपी,नर्सिंग सायन्स, होमिओपॅथी यासह विविध विभागांचा सहभाग आहे. मॉडेल, डिस्प्ले बोर्ड, व्हिडिओ यासह अनेक प्रकारे याची माहिती प्रदर्शनात देण्यात आली आहे . पॅथॉलॉजी आणि ऍनाटॉमी संग्रहालये, प्रगत उच्च फिडेलिटी क्लिनिकल स्किल्स लॅबीची माहिती या प्रदर्शनात देण्यात आली आहे . प्रदर्शनाला भेट देऊ इच्छिणाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे . सर्वसामान्य जनता , महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शाळकरी मुलांना जागतिक दर्जाचे संग्रहालय, कॅडेव्हर्स आणि प्रयोगशाळांमधील मनोरंजक नमुने आरोग्य सेवेची माहिती मिळणे सुलभ करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

हे आरोग्य विज्ञान प्रदर्शन, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह सर्वांसाठी खुले आहे. हे प्रदर्शन 21 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. प्रदर्शनात सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे. हे आरोग्य विज्ञान प्रदर्शन रविवारसह सर्व दिवस सकाळी 9.00 ते संध्याकाळी 6.00 पर्यंत खुले आहे . या संदर्भात जेएनएमसीचे प्राचार्य डॉ. एन.एस. महंतशेट्टी यांनी आमच्या न्यूजशी बोलताना सांगितले की, या प्रदर्शनात मेडिकल, डेंटल, फार्मसी, होमिओपॅथी, आयुर्वेद, नर्सिंग, फिजिओथेरपी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व नागरिक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्य व विज्ञानाची माहिती घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली.
केएलई डेंटल कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अलका काळे यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि डॉ. प्रभाकर कोरे यांच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हे आरोग्य आणि विज्ञान प्रदर्शन आयोजित केले असल्याचे सांगितले. आमच्या कॅम्पसमध्ये आम्ही तिसऱ्यांदा अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित केले आहे. आम्ही दंत विभागाचे प्रतिनिधित्व केले, येथे दातांना संसर्ग कसा होतो..? नैसर्गिक दातांच्या रक्षणासाठी कोणते उपचार.घ्यावेत ? इतर बाबींचीही माहिती आम्ही जनतेला देत आहोत. तोंडाचा कर्करोग आता सामान्य आहे. कारण गुटखा, तंबाखू, पान खाल्ल्याने लोकांना कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा व्यसनांपासून दूर राहण्याची विनंती केली आहे.

हे विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, यामुळे आम्हाला चांगला अनुभव मिळाला . पुस्तकात जे दिसतंय आणि प्रत्यक्षात जे दिसतंय त्यात खूप फरक आहे. आम्हाला येथे भरपूर ज्ञान मिळवता आले. मी केएलई संस्थेचे यासाठी आभार मानू इच्छितो.
KLE JNMC विद्यापीठात पुढील सहा दिवस आरोग्य विज्ञान प्रदर्शन होणार आहे. बेळगावच्या जनतेने वेळात वेळ काढूनया प्रदर्शनाला एकदातरी भेट द्यावी .


Recent Comments