Hukkeri

घोडगेरी गावात अबकारी धाड : १३८ लिटर मद्य जप्त

Share

हुक्केरी तालुक्यातील घोडगेरी गावात बेकायदेशीर मद्य विक्री होत असल्याच्या माहितीवरून हुक्केरी झोनचे उत्पादन शुल्क निरीक्षक विजयकुमार मेळवंकी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गावातील जनता प्लाट मधील घरावर छापा टाकून 138 लिटर, ओरिजनल चॉईस पाऊच जप्त करूनकेले आहेत . बेकायदेशीर मद्य विक्री करणाऱ्या अजिता निरंजन तग्गीनमनी हिला अटक करून तिला न्यायालयासमोर हजर केले.

घरमालक आणि चंद्रप्पा तळवार फरार झाले असून, अबकारी त्यांचा शोध घेत आहेत . अतिरिक्त आयुक्त बेळगाव, बेळगावचे उत्पादन शुल्क सहआयुक्त, उत्पादन शुल्क बेळगाव व चिक्कोडीचे उपायुक्त तथा उत्पादन शुल्क चिक्कोडी उपविभागाचे मानद उपअधीक्षक सुनीलकुमार डी. यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली .

Tags:

illegal-liquor-seized-by-hukkeri-police/