Belagavi

आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर बास्केटबॉल स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या दिव्यांग खेळाडूंचा सत्कार

Share

सुरेश यादव फाउंडेशनचे संस्थापक सुरेश यादव यांनी 2022 च्या आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर बास्केटबॉल स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या आणि क्रीडा प्रकारात यश मिळवून भारताचा झेंडा उंचावणाऱ्या सर्व शारीरिकदृष्ट्या अपंग खेळाडूंना सरकारकडून अधिक मदत आणि सहकार्याचे आवाहन केले.

व्हील चेअर बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया, ऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया आणि इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेडक्रॉस यांच्या संयुक्त विद्यमाने भारतात प्रथमच उत्तर प्रदेशातील नोएडा येथे 7 ते 11 नोव्हेंबर हे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

भारताच्या या पहिल्या आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर बास्केटबॉल स्पर्धेत भारतासाठी रौप्य पदक जिंकणाऱ्या पुरुष संघात खेळणाऱ्या कर्नाटकच्या बसप्पा सुंधोली आणि या स्पर्धेतील महिला संघात खेळणाऱ्या कर्नाटकच्या मायाव्वा सन्निनगंणावर आणि ललिता गवस यांचा त्यानी सत्कार केला. यावेळी ते म्हणाले कि , “सरकारकडून दिव्यांगांना अधिक नोकऱ्या आणि अनुदान मिळवून देण्यासाठी काम करत आहे.

“यावेळी रौप्यपदक जिंकणाऱ्या संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करू द्या आणि पुढील वर्षी सुवर्णपदक मिळवून द्या. त्यांना शासनाकडून मदत व सहकार्य देण्याचा प्रयत्न करेन.” असे नगर सेवक राजशेखर डोणी म्हणाले

रविशंकर विद्यावर्धक संस्थेचे शंकर बागेवाडी म्हणाले, “शारीरिक अपंगत्वापेक्षा मानसिक अपंगत्व जास्त धोकादायक आहे. दिव्यांग व्यक्ती अनेक क्षेत्रात विशेष रस आणि कर्तृत्व दाखवत आहेत. त्यांना सहानुभूतीपेक्षा पेक्षा मदत, सहकार्य आणि प्रेमाची गरज आहे. बिगर सरकारी संस्था तसेच सरकारने दिव्यांगांना समर्थन आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

क्रीडापटू बसप्पा सुनाधोली म्हणाले, “आमच्यासारख्या लोकांची कामगिरी ओळखून त्यांनी आमचा सन्मान केला हे आमच्यासाठी प्रोत्साहनपर आहे . यासाठी त्याने फाउंडेशनच्या सदस्यांचे आभार मानले . विविध देशांच्या संघांनी प्रतिनिधित्व केलेल्या सामन्यात कंबोडियाने सुवर्णपदक जिंकले आणि नेपाळच्या संघाने विजेतेपद पटकावले. आम्ही रौप्य पदक जिंकले. जर आम्हाला अधिक प्रोत्साहन मिळाले तर आम्हाला आणखी यश मिळण्याची आशा आहे.

यावेळी मल्हार दीक्षित , स्नेहा बेल्ली , फकिरप्पा करविनकोप्प आदी उपस्थित होते.

Tags:

felicitated to handicapped basketball players at belagavi