खानापुर तालुक्यातील नंदगड येथील तालुका मार्केटिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

गेली 17 वर्षे सहकार क्षेत्रात कार्यरत असलेले माजी आमदार डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी तालुका मार्केटिंग सोसायटीच्या विकासासाठी अथक परिश्रम घेतले असून विद्यमान अध्यक्ष श्रीशैल माटोल्ली यांनी दोन वर्षांच्या कार्यकाळानंतर राजीनामा दिला आहे.

इतर संचालकांनी खानापुर तालुक्यासाठी माजी आमदार अरविंद पाटील यांच्या नावाची एकमताने शिफारस केली आहे.सहकार क्षेत्रात सलग 17 वर्षे सेवा देणारे अरविंद पाटील हे या तालुका मार्केटिंग सोसायटीच्या विकासासाठी रात्रंदिवस झटले आहेत . .यावेळी सर्व संचालकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.


Recent Comments