Belagavi

मुत्यानट्टी येथील मुलांची ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट पदकांची कामगिरी

Share

बेळगाव तालुक्यातील मुत्यानट्टी मुलांनी ज्युडो स्पर्धेत लहान व मोठ्या गटामध्ये अनेक पदके पटकावली.

21 नोव्हेंबर रोजी अनंतपूर, शिमोगा येथे झालेल्या लहान व मोठ्या गटातील ज्युडो स्पर्धेत, विष्णू याने 73 किलो वजनी गटात सुवर्णपदक, चेतनने 66 किलो वजनी गटात सुवर्णपदक, योगेशने 30 किलो वजनी गटात सुवर्णपदक, संदीपने 35 किलो गटात सुवर्णपदक, गौतमने 40 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. प्रीतम याने 45 किलो वजनी गटात सुवर्णपदक, रक्षिता नाईक हिने 28 किलो सुवर्णपदक, सिंचना हिने 28 किलो गटात रौप्यपदक, मनोज याने 35 किलोवजनी गटात रौप्यपदक, चेतन याने 66 किलो गटात रौप्यपदक, हल्लाप्पा 30 किलो गटात कांस्यपदक, परशुराम 40 किलो गटात कांस्यपदक, इरामनी 55 किलो गटात कांस्यपदक, सिद्राई 50 किलो गटात कांस्यपदक, सिद्राई 60 किलो गटात कांस्यपदक मिळवून प्रियाने 36 किलो कांस्य पदक जिंकून बेळगाव जिल्ह्याचे नाव उंचावले आहे .

Tags:

belagavi-mutyanatti-judo-players-won-gold-medals/