बैलहोंगल वसतिगृहात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे .

बैलहोंगल शहरातील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
बैलहोंगल तालुक्यातील कोडीवाड गावातील परशुराम कोनेरी या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. इतर विद्यार्थी कॉलेजला निघाल्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. विद्यार्थ्याने दरवाजा न उघडल्याने इतर विद्यार्थ्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. बैलहोंगल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.


Recent Comments