Athani

स्वास्थपूर्ण आणि व्यसनमुक्त गावकऱ्यांसाठी स्वामीजींची गावात झोळी पदयात्रा

Share

गावकऱ्यांना स्वास्थपूर्ण व व्यसनमुक्त करण्यासाठी कल्याण हिरेमठ गुणदालचे परमपूज्य डॉ. विवेकानंद देवरु संपूर्ण सत्ती गावात झोळी घेऊन फिरले.

बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील सत्ती गावातील श्री बाळकृष्ण महाराज यांच्या पुण्यराधना रजत महोत्सव कार्यक्रमानिमित्त गावात प्रवचन कार्यक्रमासाठी कल्याण हिरेमठ गुणदालचे परमपूज्य डॉ. विवेकानंद देवरु दाखल झाले व त्यांनी ग्रामस्थांना व्यसनांपासून दूर राहण्याची सूचना केली.

यावेळी गावात स्वामीजींसहित पदयात्रा काढण्यात आली . दुर्गुणांच्या आहारी गेलेल्या ग्रामस्थांनी, त्याचप्रमाणे तंबाखू , सिगारेटचे व्यसन असलेल्या ग्रामस्थांनी त्यांचे दुर्गुण श्रींच्या झोळीत टाकून श्रीना वचन दिले की ते यापुढे या व्यसनांपासून दूर राहून व्यसनमुक्त होतील. याच संदर्भात श्री म्हणाले की, भगवंताने दिलेल्या देहाचा व्यसनापायी विनाश करणे म्हणजे परमेश्वराचा विश्वासघात करण्यासारखे आहे . दारू व अंमली पदार्थांच्या सेवनामुळे व्यक्तीचे नैतिकदृष्ट्या अध:पतन होऊन कुटुंबातील मान-सन्मान गमावून ती व्यक्ती जीवन जगत असते. अंमली पदार्थांपासून फायदा होत नसून तोटाच जास्त असतो, त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहिलेलेच बरे, असे ते म्हणाले.

Tags: