Belagavi

धर्माचे पालन केले तरच यश मिळते : सी. एम. इब्राहिम

Share

धर्माने काम केले तरच यश मिळते, असे मत माजी केंद्रीय मंत्री आणि जेडीएस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांनी व्यक्त केले.

 

हुक्केरी शहरातील बेळगाव जिल्हा मुस्लिम कल्याण आणि शिक्षण संस्थेच्या टिपू सुलतान महाविद्यालयाला इब्राहिम यांनी आज सोमवारी भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, मी काँग्रेस पक्षात केंद्रीय मंत्री आणि विधान परिषदेचा सदस्य म्हणून काम केले आहे. मी राजीनामा दिला आणि जेडीएस पक्षात प्रवेश केला. अजून चार वर्षे बाकी आहेत. मी कोणावर अन्याय केलेला नाही, पण त्यांची विचारधारा सर्वसामान्यांच्या विरोधात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जेडीएस पक्षालाच सत्ता मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मुस्लिम कल्याण व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष इक्बाल पीरजादे यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
व्यासपीठावर जेडीएसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव पाटील, जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी, शाहिदरजा पीरजादे, इर्शाद मोकाशी, बाबाजान काझी, इमाम बागवान, शरीफा नदाफ, शाहिदा बागवान, भीमसेन बागी आदी उपस्थित होते. तत्पूर्वी इब्राहिम यांनी हजरत दादा कलामी दर्ग्याला भेट देऊन नमाज अदा केली.

Tags: