12 वर्षांचा लहान मुलगा जो एकाही किडनीशिवाय जन्माला आला होता, एकाच किडनीवर मोठा झालेला हा मुलगा, आता त्याची ही एकमेव किडनीही निकामी झाली आहे. यामुळे तो मुलगा मृत्यूच्या दारात पोहोचला आहे. या चिमुरड्याच्या वडिलांचे ६ महिन्यांपूर्वी निधन झाले आहे . आपल्या मुलांसह भाड्याच्या घरात राहणारी आई , मुलाला वाचवण्याची मदतीची याचना करत असून तरुणांच्या एका गटाने या आईला आधार दिला आहे .


होय, विजापूर जिल्ह्यातील चडचण शहरातील रहिवासी दयानंद वाली यांचा मुलगा इरण्णा, एका मूत्रपिंडाशिवाय जन्माला आला होता. आजवर तो फक्त एकाच किडनीवर जगत होता . आता त्याची एकमेव किडनी देखील निकामी झाली आहे . डॉक्टरांनी सांगितले आहे की 12 वर्षांच्या इरण्णाला वाचवायचे असेल तर किडनी प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय आहे . तरच हा मुलगा जगू शकेल. या उपचारासाठी 25 लाखांचा खर्च अपेक्षित आहे . त्यामुळे या गरीब कुटुंबावर जणू आघातच झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याचे वडील दयानंद यांचे आजारपणामुळे निधन झाले. दयानंद यांच्या पत्नी अश्विनी यांनी त्यांच्या उपचारासाठी घर विकले मात्र त्याचा काही उपयोग न होता दयानंद यांचे निधन झाले . त्यामुळे आता भाड्याच्या घरात राहणाऱ्या अश्विनी यांना पतीच्या निधनानंतर आपल्या मुलाला वाचवण्यासाठी इतरांच्या मदतीची गरज आहे ..

या कुटुंबाच्या मदतीसाठी , टीम चडचन बॉईज नामक तरुणांच्या गटाने पुढाकार घेतला आहे . आणि फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, ट्विटर सारख्या सोशल मीडियाद्वारे लोकांना आवाहन मदतीसाठी आवाहन करत आहे. यावरच न थांबता या तरुणांच्या या गटाने स्वत: बॉक्स घेऊन शाळा-कॉलेजांमध्ये जाऊन या मुलावर उपचार करण्यासाठी देणग्या गोळा केल्या आहेत. या तरुणांच्या गटाने कोविडच्या काळात देखील लोकांना मदत केली होती, पॉवर स्टार पुनीत राजकुमार यांच्यामुळे प्रेरित होऊन त्यांनी इराण्णाला मदत करण्याचा निर्धार केला आहे. पण ते एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे जमा करू शकत नसल्याने , देणगीदारांनी या मुलाच्या उपचारासाठी मदत करावी आणि सहकार्य करावे ही विनंतीही या तरुणांच्या गटाकडून करण्यात येत आहे.

एकाच किडनीवर इतके दिवस जगलेल्या मुलाला आता अपरिहार्यपणे किडनी प्रत्यारोपण करावे लागेल. आजही जगण्याचे आणि आईची चांगली काळजी घेण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या या मुलाला देणगीदारांनी मदत करणे गरजेचे असून, निवडणूक आली की, आपले मत मागण्यासाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही उपचारासाठी सहकार्य करावे, अशी आमची अपेक्षा आहे.
त्याचे खाते क्र
कॅनरा बँक, चडचण शाखा
अश्विनी दयानंद वाली
खाते क्रमांक : 110084273887
IFSC : CNRB0010813
फोन पे, गुगल पे नंबर-6362964900


Recent Comments