Belagavi

नंदगडमध्ये मराठी व उर्दू शाळांच्या नूतन वर्गखोल्यांचे उदघाटन

Share

नंदगड येथील उर्दू तसेच मराठी शाळांच्या नूतन वर्गखोल्यांचे आमदार डॉ . अंजली निंबाळकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले .

 

खानापूर तालुक्यातील नंदगड गावातील जेसीएस आवारातील उर्दू कन्या शाळेच्या नवीन वर्गखोलीचे तसेच मराठी शाळेच्या नूतन वर्गखोलीचे आ . डॉ . अंजली निंबाळकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले . शालेय मुलांसाठी या नवीन वर्गखोल्यांचा शुभारंभ केल्याने मुलांच्या शिक्षणाची अधिक चांगली सोय होणार आहे . यावेळी शाळा सुधारणा कमिटी तसेच शिक्षकांकडून , आ . डॉ . अंजली निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला .

Tags: