बेळगावमधील शिवबसव नगरातील , श्री ज्योतिर्लिंग मंदिरात कार्तिक मासानिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला . असंख्य दिव्यांच्या लखलखाटाने मंदिरासह परिसर उजळून निघाला होता .


रविवारी सायंकाळी आयोजित केलेल्या या दीपोत्सवात , बेळगाव शहर आणि परिसरातील शेकडो जोतिबा भक्तांनी सहभाग घेतला होता . दीपोत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती . मंदिर परिसरात आदिशक्ती मंडळाच्या ३० सदस्यांनी आकर्षक रांगोळ्या घालून मंदिर परिसर शोभिवंत केला होता .

या बद्दल या मंडळाच्या सदस्यांनी माहिती दिली .
मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ऍड . अमर येळ्ळूरकर यांनी या दीपोत्सवाची माहिती देताना सांगितले कि , कुलदैवताला जाऊन कार्तिक मासात दीप लावावा असे पुराणात म्हटले आहे . बेळगावच्या बहुसंख्य नागरिकांचे जोतिबा हे कुलदैवत आहे . या मंदिरात विविध जातीधर्माचे लोक दर्शनासाठी येतात . गेल्या दहा वर्षांपासून आम्ही हा दीपोत्सव साजरा करीत आहोत .
दीपोत्सवानिमित्त मंदिर परिसरात इ -हुंडीचा लोकार्पण सोहळा पार पडला . इ -हुंडीमुळे मंदिर व्यवस्थापनाचा सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शक होण्यास मदत होईल. यावेळी उपस्थितांना इ – हुंडीबद्दल माहिती देण्यात आली . यासाठी शिवबसवनगर येथील एसबीआय बँकेच्या चीफ मॅनेजर आशा कोटणीस यांचे सहकार्य लाभले .


Recent Comments