Belagavi

तिसरे विश्व कन्नड संमेलन बेळगावमध्ये घ्यावे : कर्नाटक युवा वेदिकेची मागणी

Share

तिसरे विश्व कन्नड संमेलन बेळगावमध्ये घ्यावे असा आग्रह कर्नाटक युवा वेदिकेने केला आहे.

 

सोमवारी , शहरातील राणी चन्नमा सर्कलमध्ये जमलेल्या कर्नाटक युवा वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी तिसरे विश्व कन्नड संमेलन बेळगावमध्ये घ्यावे अशा घोषणा दिल्या . यानंतर या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना या आशयाचे निवेदन दिले .

यासंबंधी माहिती देताना कर्नाटक युवा वेदिकेच्या जिल्हा सरचिटणीस अक्षय यांनी सांगितले कि , बेळगावात तिसरे विश्व कन्नड संमेलन घ्यावे अशी आमची मागणी आहे . यापूर्वी भाजपचे सरकार असताना 2011 मध्ये बेळगावमध्ये विश्व कन्नड संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते . आता पुन्हा भाजप सरकार सत्तेत आले आहे . त्यामुळे तिसरे विश्व कन्नड संमेलन बेळगावात घेण्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी केली .

यावेळी कर्नाटक युवा वेदिकेचे परशुराम पुजारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते .

Tags: