जागतिक शौचालय दिनानिमित्त हुक्केरी तालुक्यातील नरेगा कामगारांसाठी जनजागृती फेरी व कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

ग्रामीण पेयजल व स्वच्छता विभाग, नम्मूर बानुली समुदाय रेडिओ सेंटर, होसूर ग्रामपंचायत, करगुप्पी सरकारी हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक शौचालय दिनानिमित्त हुक्केरी तालुक्यातील नरेगा कामगारांसाठी जनजागृती फेरी व कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना महिला कल्याण संस्थेचे संयोजक एम. एस. चौगला यांनी सांगितले की, मानवी मलमूत्रामुळे जीवघेणे रोग होऊ शकतात. उघड्यावर शौचास बसल्याने 80 टक्के आजार उदभवतात. ग्रामस्थांमध्ये जागरुकतेच्या अभावामुळे अजूनही काही ठिकाणी उघड्यावर शौचास बसण्याची पद्धत सुरु आहे. त्यामुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी शौचालये बांधून वापरावीत असे आवाहन त्यांनी केले.

होसूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन गुडशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या स्वच्छ भारत योजनेचा लाभ घेऊन घरोघरी शौचालये बांधण्याचे आवाहन केले. बाईट
नंतर करगुप्पी सरकारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता जागृती फेरी काढून ग्रामीण भागातील लोकांमध्ये जनजागृती केली.

यावेळी प्राचार्य ए. जी. मुन्नोळी, बडकुंद्री फलोत्पादन केंद्राचे प्राध्यापक, नरेगा कामगार उपस्थित होते.


Recent Comments