Belagavi

बेळगावात तीन दिवसीय राज्यस्तरीय वन क्रीडास्पर्धा : सीसीएफ मंजुनाथ चव्हाण

Share

बेळगाव वनपरिमंडळातील बेळगाव विभागात वनखात्याच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा होणार आहेत अशी माहिती मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चव्हाण यांनी दिली.

बेळगाव येथील अरण्य भवन येथे आज रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना मंजुनाथ चव्हाण म्हणाले की, 23, 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी राज्यातील 13 वनपरिमंडळ आणि 1 प्रशिक्षण अकादमीचे कर्मचारी अधिकारी या क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहेत. एकूण 1100 खेळाडूंनी विभागातील अधिकाऱ्यांकडे या आधीच नोंदणी केली आहे. यामध्ये 900 पुरुष आणि 200 महिला खेळाडू सहभागी होणार आहेत. तीन दिवसीय स्पर्धा शहरातील विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटी (व्हीटीयू) कॅम्पसमध्ये आणि बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील इतर भागात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वन विभागाच्या शिपाईपासून ते फॉरेस्टर ते विभागप्रमुख, पीसीसीएफपर्यंतचे सर्व दर्जाचे अधिकारी या खेळात सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी सीसीएफ मंजुनाथ चव्हाण यांच्या हस्ते या खेळांच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.

पत्रकार परिषदेत बेळगाव वनपरिमंडळाचे डीसीएफ हर्षा भानू, पीकेएम प्रशांत, सी. जी. मिर्जी, अँथनी मरियप्पा, एस. के. लगोरवर, एसीएफ सुनीता निंबरगी, एम. बी. कुसनाळ, शिवरुद्रप्पा कबाडगी आदी उपस्थित होते.

Tags: