बेळगावमधील सरदार मैदानावर कर्नाटक रक्षण वेदिकेच्या वतीने राज्योत्सव साजरा करण्यात आला .
कर्नाटक रक्षण वेदिकेच्या प्रवीण शेट्टी गटाचे , प्रवीण शेट्टी आणि कन्नड चित्रपट अभिनेता डॉली धनंजय यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून सर्व कन्नडिगांना त्यांच्या खास शैलीत राज्योत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी स्थानिक कलाकारांनी संगीत सादर केले, त्यानंतर पाहुणे, प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षांनी कन्नड आणि बेळगाव राज्योत्सवाबद्दल कौतुगोद्गार काढले .
यानंतर प्रसिद्ध जी कन्नड टीव्ही वाहिनीच्या कॉमेडी खिलाडीगळू टीमच्या कलाकारांनी आयोजित केलेल्या विनोदी कार्यक्रमाने सर्वांचे मनोरंजन केले.
या कार्यक्रमाला संरक्षण मंचचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण शेट्टी, डॉली धनंजय, बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, संरक्षण मंचचे राज्य व जिल्हा पदाधिकारी , कार्यक्रमाचे आयोजक अभिलाष, बाळासाहेब उदगट्टी आदी उपस्थित होते.


Recent Comments