बेळगावात बिलीव्ह फाऊंडेशनतर्फे रस्त्याकडेला आसरा घेतलेल्या गरजू-गरीब निराधारांना ब्लँकेटचे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
होय, रस्त्याकडेला आसरा घेतलेल्या निराधारांना ब्लँकेटचे वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम बिलीव्ह फाऊंडेशनतर्फे बेळगावात राबविण्यात येत आहे. सध्या हिवाळ्याचा मोसम सुरु असून कडाक्याची थंडी पडत आहे. या पार्श्वभूमीवर सौरभ सावंत आणि अवधूत तुडयेकर यांनी बेळगाव शहरात रात्री फिरून रस्त्याकडेला राहणाऱ्या बेघरांना ब्लँकेटचे वाटप केले. सिटी रेल्वे स्टेशन, बस स्टँड. भाजी मार्केट आणि इतर अनेक भागात भेट देऊन त्यांनी हा सामाजिक उपक्रम राबवून कौतुकास्पद कार्य केले.

यासाठी अनिकेत धरमदासानी, विवेक महंतशेट्टी, संजय पाटील, उदय मुरकुंबी, शैलेश देसाई यांनी सहकार्य केले.


Recent Comments