हुक्केरी तालुक्यातील अवरगोळ गावात दलित स्मशानभूमीसाठी राखीव ठेवलेल्या जमिनीवर दुसऱ्याने अतिक्रमण केले आहे . स्मशानभूमीची जमीन आम्हाला परत द्या अशी मागणी गावातील दलित बांधवानी केली आहे.

गावातील शेकडो दलितांनी आमची जमीन परत द्या अशी मागणी करीत त्या जागेवर आपल्या नावाचा फलक लावण्यासाठी त्या ठिकाणी गेले असता , जमीन मालक अशोक याने सांगितले की, ही आमची जमीन असून नावाचा फलक काढण्यासाठी न्यायालयात खटला सुरू आहे. यावेळी मोठा वाद निर्माण होऊन गोंधळ उडाला यातच एका दलित मुलीच्या तोंडाला बोर्ड लागल्याने रक्त आले.
दलित नेते बसवराज देवगोळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना तक्रार केली की, अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून जमिनीसंदर्भात निर्णय दिला आहे , त्यामुळे आज आम्ही जमिनीचा ताबा घेण्यासाठी आलो असता अशोकने रागाच्या भरात येऊन आमच्यावर हल्ला केला आणि नावाचा बोर्ड फेकून दिला
आणखी एक दलित युवक सुनील याने सांगितले कि, आंबेडकरांच्या नावाचा फलक फाडून आमच्यावर हल्ला करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे .
त्यानंतर अशोक अंकलगी यांनी सांगितले की, या सर्वेक्षणात तीन लोकांची जमीन असून त्यात तालुका पंचायतीचीही जमीन आहे, अधिकाऱ्यांनी योग्य सर्वेक्षण करून त्यातील दोघांना जमीन द्यावी व उर्वरित भाग त्यांना द्यावा. हा वाद कोर्टात असूनदेखील दलित येऊन जमिनीवर नावाच्या पाट्या लावत आहेत.
यावेळी आंबेडकरी जनजागृति मंचाचे नेते आनंद लेखापाल, नागेश वळवी, चिदानंद हिरेकेंचनवर, रमेश लेखापाल, बसवराज शिंगे, मल्लाप्पा गुमाची, शोभा लेखापाल, आदी उपस्थित होते.


Recent Comments