Belagavi

महर्षी वाल्मिकी वैचारीक जत्रा 8 व 9 फेब्रुवारीला : प्रसन्नानंदपुरी स्वामीजींची माहिती

Share

महर्षी वाल्मिकी जत्रा जागृतीसाठी केली जात आहे. ही एक वैचारिक जत्रा आहे. कोंबडी आणि मेंढ्याचा बळी दिला जातो ती जत्रा नाही असे राजनहळ्ळी चे श्री प्रसन्नानंदपुरी स्वामीजी म्हणाले.

बेळगावातील 2023 सालच्या श्री महर्षी वाल्मिकी जत्रेच्या पार्श्वभूमीवर श्री महर्षी वाल्मिकी गुरुपीठाचे श्री प्रसन्नानंदपुरी स्वामीजींनी मार्गदर्शन केले . उत्तर कर्नाटकातील लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी 19 डिसेंबरपासून बेळगावातील सुवर्णसौध येथे अधिवेशन घेण्याचे आदेश मुख्यमंत्री बोम्मई यांनी जारी केले आहेत. महर्षी वाल्मिकी जयंती आणि जत्रा हे आपल्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. जनजागृतीसाठी राज्यभर ही जयंती साजरी केली जाते. तसेच अखंड कर्नाटकातील समस्त बेड वाल्मिकी समाजातर्फे 8 व 9 फेब्रुवारी 2023 रोजी 5 वी ऐतिहासिक वाल्मिकी जत्रा आयोजित करण्यात आली आहे. या मेळाव्यात मोठ्या संख्येने समाजबांधवानी सहभागी व्हावे त्याचप्रमाणे सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी केली.

स्वामीजी पुढे म्हणाले की सुमारे 2 कोटी खर्च करून नवीन रथ बांधण्यात आला आहे. कर्नाटकच्या इतिहासातील सर्वात मोठा ८१ फूट उंच रथ तयार करण्यात आला आहे. आपल्या गुरूंचा ऐतिहासिक वारसा समस्त वाल्मिकी समाजाने पुढे चालवूया . प्रसन्नानंदपुरी स्वामीजी म्हणाले की रामायणातील सर्व प्रसंग या रथामध्ये मध्ये सुंदर कोरलेले आहेत.

अशोक कुरेरा राजशेखर तळवार, जमन्नावर, एस.एस.निंगानी, संजय नाईक आदी प्राथमिक बैठकीत उपस्थित होते.

Tags:

prasannanandpuri-swamiji/