बेळगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील काजू उत्पादकांना योग्य भाव देण्यासह गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आणि पुरुषांना रोजगार देण्यासाठी बेळगुंदीजवळील यळेबैल येथे उभारलेल्या स्मार्ट कॅश्यु एलएलपी उद्योगाचे आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार समारंभात उदघाटन करण्यात आले.
होय, बेळगाव तालुक्याचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते नागेश मन्नोळकर यांनी या भागातील लोकांना रोजगार देण्यासाठी काजू कारखाना स्थापन केला आहे. देशातील प्रसिद्ध इमोसिस ग्रुपसोबत बेळगुंदीजवळील सोनोली-यळेबैल गावात एक स्मार्ट कॅश्यू एलएलपी ही फॅक्टरी सुरू केली आहे. या फॅक्टरीचे उद्घाटन आज शनिवारी माजी मंत्री व गोकाकचे विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी आणि बेळगावच्या खासदार मंगल अंगडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार आणि भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील, अभिनेता राज के. पुरोहित, भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव किरण जाधव, उद्योजक कृष्णा शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

फॅक्टरी उदघाटनानंतर माहिती देताना उद्योजक श्रीकृष्ण उपाध्याय म्हणाले की, या भागातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक मशीनच्या सहाय्याने या कारखान्यात दररोज पाच टन काजू तयार होऊ शकतात. या कारखान्याच्या सुविधांचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
त्यानंतर बोलताना माजी आमदार आणि भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील म्हणाले, नागेश मन्नोळकर हे चांगले उद्योजक सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी हा नवीन कारखाना सुरू केला आहे. त्यामुळे या भागातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना चांगला नफा मिळेल. मथूरा येथील कृष्णा शर्मा आणि कृष्णा उपाध्याय हा कारखाना चालवणार आहेत. त्यांनी अशीच प्रगती करून आणखी दोन कारखाने सुरू करावेत अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
चित्रपट अभिनेते राज पुरोहित यांनी, नागेश मन्नोळकर यांच्या धाडसाचे कौतुक करून त्यांच्या या नवीन उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी बोलताना मालक नागेश मन्नोळकर यांनी सांगितले की, या भागात मोठ्या प्रमाणात काजू उत्पादन होते. त्यामुळे आम्ही दररोज 5 ते 6 टन काजू प्रक्रिया उत्पादन करू शकतो. या भागातील काजू उत्पादकांना योग्य दर देण्यासह अनेक लोकांना आम्ही रोजगार उपलब्ध देत आहोत असे सांगून सर्वांनी आपल्या या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. बाईट
या कार्यक्रमाला भाजप नेते किरण जाधव यांच्यासह इमोसिस ग्रुप ऑफ कंपनीजचे आणि स्मार्ट कन्स्ट्रक्शनचे अधिकारी, कर्मचारी आदी अनेकजण उपस्थित होते.


Recent Comments