Belagavi

मंगाई नगरमध्ये जाण्यासाठी असलेला रस्ता मोकळा करून द्यावा: रहिवाशांची मागणी

Share

वडगाव येथील मंगाई नगरमध्ये जाण्यासाठी असलेला रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी करीत मंगाई नगरातील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले .

यासंबंधी हकीकत अशी कि , बेळगावच्या वडगाव भागातील मंगाई नगरातील रहिवाशांना आपल्या निवासस्थानी जाण्यासाठी एकच मार्ग होता . हा रस्ता कंपाउंड घालून बंद करण्यात आल्याने रहिवाशांना आपल्या राहत्या ठिकाणी जाण्यासाठी गैरसोय निर्माण झाली आहे . या विरोधात आज शनिवारी मंगाई नगरातील महिला रहिवाशांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून आपल्या मागणीच्या पूर्ततेचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले .

यासंबंधी माहिती देताना इथल्या महिलांनी सांगितले कि , मंगाई रोड , सेकंड क्रॉस येथील जागामालकाने रस्ता बंद केल्याने आमची सर्वांची गैरसोय होत आहे . महिला मुलांना तसेच वृद्ध मंडळींना यामुळे खूपच त्रास सहन करावा लागत आहे . त्यामुळे आम्हाला हा रस्ता मोकळा करुन द्यावा अशी मागणी त्यानी यावेळी केली .

यावेळी बोलताना इथल्या एका दिव्यांग रहिवाशाने सांगितले कि , रास्ता खुला असताना तो गाडीने घरापर्यंत जात होता मात्र आता गाडी दुसऱ्या ठिकाणी ठेवून जावे लागत आहे त्यामुळे माझ्यासारख्या दिव्यांग व्यक्तीची फारच मोठी गैरसोय होत आहे . हा रस्ता पूर्वीप्रमाणे खुला करुन द्यावा अशी मागणी त्याने यावेळी केली .

या भागातील रहिवाशी असलेल्या एका जेष्ठ नागरिकाने सांगितले कि , आम्हाला दुसरं काही नको हा रस्ता तेवढा खुला करुन देण्यात यावा .

यावेळी मंगाई नगरातील महिला मोठ्या संख्यने उपस्थित होत्या .

Tags: