राज्य सरकारच्या जिल्हाधिकाऱ्यांचे पाऊल गावाकडे या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत ,
कागवाड तालुक्यातील शेडबाळ स्टेशन गावात तहसीलदार राजेश बुर्ली व तालुक्यातील सर्व विभागीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून येथील जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या.

शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात , महिला व बालकल्याण विभागातर्फे विविध पेन्शन योजनांना जागेवरच मंजुरी देण्यात आली तसेच मुलींसाठी भाग्यलक्ष्मी योजनेच्या पासबुकचे वाटप करण्यात आले.
सकाळी तहसीलदार राजेश बुर्ली, सीडीपीओ संजीवकुमार सदलगी , बीईओ एम.आर मुंजे , शेडबाळ नगरपंचायतचे मुख्याधिकारी मंतेश कोल्हापुरे , व इतर विभागाचे अधिकारी नगर पंचायत सदस्यांनी गावातील मुख्य रस्त्यासमोर ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या.
शेडबाळ स्टेशन गावातील हनुमान मंदिर सभाभवनात लोकांची बैठक झाली. बैठकीत त्यांनी गटार, रस्ते बांधकाम, पेन्शन व हनुमान मंदिर सभागृह, स्मशानभूमीचे काम पूर्ण करणे आदी मागण्या मांडल्या . यावेळी अनेक लोकांच्या समस्या जागेवरच सोडवण्यात आल्या .
तहसीलदार राजेश बुर्ली व इतर अधिकाऱ्यांनी लोकांसाठी दाखविलेल्या काळजीबद्दल स्थानिकांनी त्यांचे कौतुक केले.
अण्णासाब कोरे, रेशीम विभागाचे एम.बी.मुल्ला, पाटबंधारे विभागाचे प्रवीण हुनसिकट्टी, समाजकल्याण विभागाच्या जे.बी.ना रोटे, हेस्कॉम विभागाचे एस.एस.जोगी, मुख्याधिकारी महांतेश कोल्हापुरे, एम.बी.मुल्ला के.पी.बडिगेर व इतर विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी स्थानिक नगरपंचायत सदस्य मारुती माकनवर, श्रीमती रेणुका हुनकांबळे, प्रमोद , अण्णा साहेब , सुकुमार बारगळे, बसप्पा चोळके, तुकाराम हुनकांबळे, बाळू हरळेकर, हनुमंत चोळके, सदाशिव चोळके, राजकुमार चोळके आदी उपस्थित होते.


Recent Comments