Belagavi

केएएस अधिकारी सचिन हळेमनी यांचा मादिग समाजातर्फे सत्कार

Share

केएएस अधिकारीपदी नियुक्ती झालेले बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी येथील सचिन हळेमनी यांचा मादिग समाजातर्फे सत्कार करण्यात आला.
केएएस परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी अधिकारी पद मिळवून समाजाचा लौकिक वाढविण्याच्या पार्श्वभूमीवर मादिग समाजाच्या नेत्यांनी सचिन हळेमनी यांचा शाल व म्हैसुरी फेटा घालून गौरव केला.

यावेळी मादिग आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष बसवराज अरवली, नेते यल्लाप्पा हुदली, रमेश रायप्पगोळ, मारुती रंगापुरे, गोपाल नंदी, निंगाप्पा तळवार, शिक्षक अर्जुन सागर आदी उपस्थित होते.

Tags:

kas-officer-sachin-halemani-felicitated-by-madig-community/