Belagavi

बेळगावच्या दिव्यांग बास्केटबाँलपटूंची चमकदार कामगिरी

Share

नोयडा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर बास्केटबाँल स्पर्धेत बेळगावच्या दिव्यांग बास्केटबाँलपटूंनी भारतीय संघातून खेळून चमकदार कामगिरी केली.

होय, 6 ते 11 नोव्हेंबर या दरम्यान, नोयडा येथे दिव्यांग बास्केटबाँलपटूंची आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर बास्केटबाँल स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यातील दिव्यांग बास्केटबाँलपटू बसवराज सुनदोळी, ललिता गवस आणि माया सन्नलिंगन्नावर यांनी भारतीय संघातून सहभागी होऊन चमकदार कामगिरी केली.
या यशाबद्दल बेळगावचे जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत सीईओ तसेच जिल्हा युवा सबलीकरण आणि क्रीडा खात्याचे उपसंचालक जिनेश्वर पडनाड, बास्केटबॉल प्रशिक्षक व्ही. एस. पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Tags: