Belagavi

ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकर्यांची साखर मिळविण्यासाठी एकच धडपड एकच वजनकाटा असल्याने गैरसोय

Share

होय, खानापूर तालुक्यातील महालक्ष्मी ग्रुप संचलित लैला शुगर्स कारखान्यात गेल्या 14 तारखेपासून कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना 25 रुपये प्रतिटन दराने साखर मिळण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

तालुक्यातील सिमाभागासासहित , विविध भागातुन आलेल्या ऊस पुरवठादारांसाठी त्यांच्या पावती दाखवून तसेच आधार कार्ड नोंदणी करून , व्यवस्थित साखर मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे .मात्र त्याठिकाणी वजनकाटा एकाच ठेवण्यात आला आहे . त्यामुळे शेतकऱयांची साखर मिळवण्यासाठी धडपड सुरु आहे .त्याचप्रमाणे कारखान्याचे कर्मचारी देखील अगदी गोगलगायीच्या गतीने काम करीत आहेत . हे पाहिल्यास लैला शुगर्स कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांची फारशी पर्वा नाही अशा पद्धतीने वागत आहेत

Tags: