Belagavi

बेळगाव जिल्हा पोलीस दलाच्या क्रीडा स्पर्धाना उत्साहात सुरुवात

Share

गुन्हेगारांचा शोध घेणे त्याचप्रमाणे कायदा सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी रात्रंदिवस तणावा खाली काम करणाऱ्या पोलिसांनी आपला सर्व ताणतणाव बाजूला सारून क्रीडा स्पर्धांमध्ये उत्साहात भाग घेतला .

होय , बेळगाव शहरातील जिल्हा पोलीस कवायत मैदानावर पोलीस आयुक्तालय , शहर व जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने दोन दिवसीय वार्षिक पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक राजेंद्र कलघटगी , यांच्या हस्ते क्रीडा मशाल प्रज्वलित करून , आणि रंगबिरंगी फुगे हवेत सोडून या क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला . यावेळी पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या आकर्षक पथसंचलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

क्रीडा स्पर्धांचे उदघाटन करून बोलताना जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक राजेंद्र कलघटगी म्हणाले कि ,सीमेवर लढताना अनेकांना वीरमरण येते . पोलीस देशाचे रक्षण करतात . २४ तास ते कर्तव्य बजावत असतात . आपल्या जीवनात अनेक अडीअडचणींना तोंड देत ते आपले कर्तव्य पार पाडत असतात . वाहतूक समस्या देखील योग्यरीत्या सोडवतात . कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासह प्रत्येक गोष्टीत ते आघाडीवर असतात . आपल्या कुटुंबाची पर्वा न करता समाजासाठी काम करणाऱ्या पोलिसांचा अभिमान आहे . असे ते म्हणाले . स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांविरुद्ध लढत असताना पोलिसांनी आम्हाला अटक करून न्यायालयात हजर केले . शिक्षा भोगूनदेखील आपण इंग्रजांविरुद्ध लढलो . आणि स्वातंत्र्य मिळवण्यात यशस्वी झालो अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली . आपली आरोग्याचे रहस्य सांगताना ते म्हणाले कि , मी माझे जेवण वेळच्या वेळी करतो त्याचप्रमाणे रोज चालण्याचा व्यायाम करतो. कुठल्याही परिस्थितीत बाहेरचे पदार्थ खात नाही.

यावेळी शहर पोलीस आयुक्त डॉ . एम बी बोरलिंगय्या म्हणाले कि , पोलीस दलासाठी क्रीडा खूप महत्वाच्या आहेत. फिटनेस खूप महत्वाचा आहे . स्वास्थपूर्ण तसेच एकसंध राहण्यासाठी खेळात सहभाग घेणे आवश्यक आहे . त्याचप्रमाणे शतायुषी जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक राजेंद्र कलघटगी यांनी उपस्थित राहून पोलीस क्रीडा स्पर्धांचे उदघाटन केले हि प्रशंसेची बाब आहे . त्यांच्याकडे पाहून आम्हाला प्रेरणा मिळते.

क्रीडा स्पर्धांच्या उदघाटनावेळी , जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ . संजीव पाटील , शहर पोलीस आयुक्त डॉ . एम बी बोरलिंगय्या , अतिरिक्त पोलीस अधीक्षक महानिंग नंदगावी , डीसीपी स्नेहा पी व्ही , रवींद्र गडादी ,आदी उपस्थित होते .

शनिवारी संध्याकाळी ४ वाजता या क्रीडा स्पर्धांचा समारोप होणार आहे . या कार्यक्रमासाठी एम एल आर आय सी चे ब्रिगेडीयर जॉयदीप मुखर्जी उपस्थित राहणार आहेत . यावेळी विजेत्या संघाना तसेच खेळाडूंना पारितोषिके वितरित केली जाणार आहेत .

Tags:

district-police-annual-sports-at-belagavi/