हुक्केरी तालुक्यातील बेल्लद बागेवाडी शासकीय कन्नड प्राथमिक शाळेला कत्ती ट्रस्टने स्मार्ट टच दिला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व शासकीय शाळांना स्मार्ट टच देण्यात यावा, अशी मागणी बेळगाव जिल्हा शासकीय प्राथमिक शाळा शिक्षक संघाचे अध्यक्ष सिद्राम लोकन्नावर यांनी लोकप्रतिनिधींकडे केली.

बेल्लद बागेवाडी येथील श्रीमती राजेश्वरी विश्वनाथ कत्ती चॅरिटेबल ट्रस्टने देणगी दिलेल्या स्मार्ट क्लासची त्यांनी आज पाहणी केली. त्यानंतर देणगीदार पृथ्वी व पवन कत्ती यांची भेट घेऊन बेल्लद बागेवाडी येथील शासकीय शाळेत स्मार्ट क्लास देऊन विध्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून दिल्याबद्दल कत्ती बंधूंचे अभिनंदन केले. याचा फायदा या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होत आहे. त्यांनी कत्ती बंधूंच्या कार्याचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. अन्य लोकप्रतिनिधींनीही राज्यातील अन्य शाळांना अशाप्रकारे स्मार्ट टच द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शासकीय कर्मचारी संघटनेचे राज्य सहसचिव महांतेश नाईक, जिल्हा संघटन उपाध्यक्ष एच. एल. पुजेरी, मानद अध्यक्ष एस.आर.खानापुरे, तालुकाध्यक्ष एन. एस. देवरमनी, सरचिटणीस एस. एस. चिक्कमठ, मुख्याध्यापक के.सी.मुचखंडी, सिद्धगडलिंग कडहट्टी आदी उपस्थित होते.


Recent Comments