Belagavi

बेळगावमध्ये ६३ व्या फळपुष्प प्रदर्शनाला सुरुवात

Share

बेळगावमधील ह्यूम पार्क मध्ये आजपासून तीन दिवसीय ६३ व्या फळपुष्प प्रदर्शनाला सुरुवात झाली .

बेळगाव जिल्हा प्रशासन , फलोत्पादन खाते , जिल्हा पंचायत आणि जिल्हा बागायती संघाच्या संयुक्त विद्यमाने , तीन दिवसीय ६३ व्या फळपुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे . या प्रदर्शनात विविध प्रकारच्या फुलांनी केलेली सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे . संगीत साहित्य , मोर , जलकन्या , लहान मुलांसाठी डिझनी टाईप खेळ , फोटोशॉप, बैलगाडी ,कित्तूर राणी चन्नम्मा , संगोळी रायण्णा , त्याचप्रमाणे प्रथमच वाळू शिल्प कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे . देशभरात सुपरहिट ठरलेल्या कांतारा या चित्रपटातील देवभूमीचे प्रतिरूप या प्रदर्शनात साकारण्यात आले आहे . त्याचप्रमाणे , ग्लास आर्ट साठी बेंगळूर येथील कलाकारांना पाचारण करण्यात आले आहे .

जलबेरा , रुजींसबिक ,लिली , आर्किड आणि विविध प्रकारच्या फुलांपासून आकर्षक सजावटीच्या कलाकृती तयार करण्यात आल्या आहेत . यावेळी माहिती देताना , बागायती खात्याचे उपसंचालक महांतेश मुरगोड , यांनी सांगितले कि उद्या अळंबी उत्पादन आणि किचन गार्डन संदर्भात लोकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे . त्याचप्रमाणे मधुमक्षिका पालनासंबंधी माहित देण्यात देणार आहोत . त्याचप्रमाणे बेळगाव शहरातील संस्था तसेच घरी उत्कृष्ट उद्यान निर्मिती करणाऱ्या व्यक्तींना , त्यांनी निर्मिलेल्या उद्यानांची पाहणी करून , के एल इ तसेच बागायती महाविद्यालयातील व्याख्यात्यां कडून सर्वोत्कृष्ट उद्यानाला पारितोषिक देण्यात येणार आहे . आम्ही प्रत्येक तालुक्यातून एका शेतकऱ्याला पुरस्कार देत आहोत . आगामी काळात अधिक बागायती पिके घेण्याच्या उद्देशाने प्रोत्साहन देण्यात येत आहे . आम्ही वेगवेगळे स्टॉल्स लावले आहेत . कृषी विभाग , पीएसव्ही विभाग , पशु विभाग आपापल्या विभागातील प्रकल्पांची माहिती जनतेला देत आहेत . फुले , वाळू , काचेपासून १२ सजावटीच्या कलाकृती तयार करण्यात आल्या आहेत . रोपवाटिका , जैविक खते , कीटकनाशके , या प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध आहेत . बेळगाव शहरासहित जिल्ह्यातील जनतेने तसेच शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी आपली मराठीशी बोलताना श्री गोरखनाथ तपोवन नर्सरीचे हनुमंत रावळ यांनी सांगितले कि , मी प्रथमच बेळगावमध्ये आलो आहे . या प्रदर्शनात मी स्वतः तयार केलेली १४ वर्ष जुनी बोन्साई रोपे आणली आहेत . या प्रदर्शनात तुम्हाला ती पाहायला मिळतील.

एकंदरीत बेळगावमध्ये आयोजित केलेल्या या तीन दिवसीय फलपुष्प प्रदर्शनच लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे .

Tags:

63 flowers exhibition at belagavi