काँग्रेस पक्षाने हिंदूंबद्दल अपमानास्पद शब्द वापरणाऱ्यांना पक्षातून बाहेर काढण्याचे आणि आगामी निवडणुकीत त्यांना जनतेने योग्य धडा शिकवण्याचे आवाहन युवा ब्रिगेडचे संस्थापक सुलिबेले चक्रवर्ती यांनी केले.

हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डी शहरात विविध हिंदू संघटनांनी आयोजित केलेल्या “मी हिंदू” संमेलनात बोलताना सुलिबेले चक्रवर्ती यांनी, फारसी भाषेत हिंदू समाज म्हणजे, डाकू, गुलाम, काळा असा अर्थ आहे, मात्र त्यात कुठेही अश्लीलतेचा उल्लेख नाही, असे म्हणत अप्रत्यक्षपणे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात टीका केली.

त्यानंतर बोलताना हुक्केरी क्यारगुड्डचे अभिनव मंजुनाथ स्वामीजी म्हणाले की, हिंदू शब्दावर राष्ट्र उभे आहे, जगभरातील समुद्र हिंद महासागराला येऊन मिळालेले आहेत. अशा पवित्र हिंदूंचा अपमान करणे योग्य नाही. येणाऱ्या काळात जनता त्यांना योग्य धडा शिकवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रवी हंजी यांनी मंचावरील मान्यवरांचा सत्कार करून स्वागत केले. यावेळी हिरेहडलगी येथील हालस्वामीजी, चिक्कोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले, मंत्री शशिकला जोल्ले, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील, माजी मंत्री शशिकांत नाईक, चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजेश नेर्ली, पवन कत्ती, मारुती अष्टगी, बसवराज हुंद्री, रवींद्र हंजी, उज्वला बडवान्नाचे, बसवराज उदोशी, बसवराज बरगाली आणि हजारो हिंदू कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments