Kagawad

राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत बेंगळूर उत्तर अजिंक्य

Share

कागवाड येथील शिवानंद पदवीपूर्व कॉलेजमध्ये राज्यस्तरीय शटल बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा पार उत्साहात पडल्या. मुलांच्या गटात बेंगळूर उत्तर अजिंक्य संघाने तर मुलींच्या गटात दक्षिण कन्नड संघाने बाजी मारत अजिंक्यपद पटकावले.

पदवीपूर्व महाविद्यालयीन राज्यस्तरीय शटल बॅडमिंटन स्पर्धेचा बुधवारी शिवानंद महाविद्यालयात समारोप झाला. राज्यातील 33 जिल्ह्यांतील मुला-मुलींच्या संघांनी या स्पर्धेत भाग घेतला. यामध्ये मुलांच्या गटात शिमोगा जिल्ह्याने द्वितीय तर मुलींच्या गटात धारवाड जिल्ह्याने द्वितीय क्रमांक पटकावला.
बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी चिक्कोडी पदवीपूर्व शिक्षण विभागाचे उपसंचालक पी. आय. भंडारे होते. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करून पारितोषिक वितरण करण्यात आले.

यावेळी परमपूज्य श्री यतीश्वरानंद स्वामीजी यांनी आशीर्वचन देताना, आमचे वेदांत केसरी इनडोअर स्टेडियम म्हणजे सुवर्ण मुकुट असून, त्यावर राज्यातील विविध जिल्ह्यातील खेळाडूंनी हिरा जडवला आहे असे सांगितले. शिवानंद कॉलेजच्या संचालक मंडळाचे सचिव बी. ए. पाटील उपस्थित होते, शिवानंद पदवीधर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. व्ही. एस. तुगशेट्टी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. पदवीपूर्व कॉलेजचे प्राचार्य प्रा. पी, बी नंदाळे यांनी आभार मानले.

या समारोप समारंभात मधुसूदन बैरागी, ए. बी. गुरक्कनवर, अजय मोने, एस. एम. हुद्दार, एस. एस.सनदी, अमर एस. कोरवी, श्रीमती. एस. एस. समाजे, प्रा. एस. एस. गणे, प्रा. एम. एल. कोरे, प्रा. के. एस. कामटे, प्रा. एम. वाय. माळी, प्रा. ए. ए. पिंपळे, प्रा. एस. टी. बडिगेर, प्रा. आर. पी. मगदूम, प्रा. जी. एम. शिंदे, प्रा. पी. व्ही. चौगला आणि प्रा. पी. सी. फुटाणे उपस्थित होते.
सुकुमार बन्नुरे, आपली मराठी, कागवाड.

Tags:

/state-level-sheetal-badminton-bangalore-team-won-1st-prize/