Banglore

काँग्रेसचे नेते वैचारिकदृष्ट्या झालेत दिवाळखोर ! बोम्मई यांचा पलटवार

Share

काँग्रेसचे नेते वैचारिकदृष्ट्या दिवाळखोर झाले आहेत. सरकारने लोकांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा त्यांचा आरोप निराधार असल्याचा पलटवार मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज केला.

मतदारांच्या सर्वेक्षणाच्या नावाखाली लोकांच्या गोपनीयतेमध्ये हस्तक्षेप केल्याच्या आणि या कामाच्या खासगीकरणाचा डाव दाखल्याच्या काँग्रेसच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना बोम्मई म्हणाले की, भारतीय निवडणूक आयोगाने ब्रुहत बेंगळुरू महानगर पालिका (बीबीएमपी) आणि स्थानिक संस्थांना ‘पद्धतशीर मतदार’ शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रम’ (SVEEP) हाती घेण्याचे अधिकार दिले आहेत. सर्वेक्षणाचे हे काम अशासकीय संस्थांना सोपवले जाईल. ही पहिलीच वेळ नाही कारण 2018 मध्येही हे काम अशासकीय संस्थांना सोपवण्यात आले होते. भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशांसह मी सविस्तर चौकशीचे आदेश देईन आणि सत्य बाहेर येऊ देईन.

या मुद्यावर काँग्रेस पक्षाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, याबाबतच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी ही मागणी हास्यास्पद असल्याचे म्हटले. हाच मापदंड लावायचा असेल तर काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत तीन-तीन वेळा राजीनामा द्यायला हवा होता. हा आरोप निराधार आणि सत्यापासून दूर आहे असे बोम्मई यांनी स्पष्ट केले. बाईट

Tags:

state cm bommaih