अखिल भारत शरण साहित्य परिषद आणि रमणश्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 17 व्या वार्षिक रमणश्री पुरस्कार सोहळ्यात आज मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सहभाग घेतला.
अखिल भारत शरण साहित्य परिषद आणि रमणश्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 17 व्या वार्षिक रमणश्री पुरस्कार सोहळा आज बेंगळूर येथे पार पडला. त्यात मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सहभाग घेऊन एस. षडाक्षरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन केले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोम्माई यांनी उल्लेखनीय यश संपादन केलेल्या महनीयांना पुरस्कार देऊन गौरविले.

यावेळी गृहनिर्माण मंत्री व्ही. सोमन्ना, अखिल भारत शरण साहित्य परिषदेचे मानद अध्यक्ष गो. रु. चन्नबसप्पा, एस. षडाक्षरी, सीमाभाग विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सी. सोमशेखर, कन्नड साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष मनू बळीगार , कन्नडप्रभाचे मुख्य संपादक रवी हेगडे आदी उपस्थित होते.


Recent Comments